सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाची स्थापना ही कोकणातील लोकांची नगण्य वस्ती असालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात त्या काळी म्हणजे १ ऑन्टोबर १९७९ साली विजयादशमिच्या शुभमहुर्तावर करण्यात आली. आपण सर्वांनी संघटीत असले पाहीजे या जाणिवेतुन या मंडळाची उभारणी झाली. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाले नव्हते त्यामुळे मालवणी सभासदांची संख्या जास्त हे लक्षात घेवुन दक्षिण रत्नागिरी उत्कर्ष मंडळा या नावाने मंडळाने आपले कार्य सुरु केले. कालांतराने जिल्ह्याचे विभाजन झाले आणि ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष ’’ हे नाव पुढे नावारुपास आले.

उपक्रम

मंडळाच्या माध्यमातून स्वातंञ्यदिनास स्नेहमेळावा, मंडळाच्या वाढदिवशी विविध संस्थांना मदत , रक्तदान शिबिरे ज्येष्ठांचा गुणवंतांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच नैसर्गिक आपत्तीत आणि अपघातग्रस्तांनाही मदत करण्यात येते. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कोकणातून पुणे पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या गुणवंत विद्यार्थी कलाकार ,खेळाडू विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जातो .

सिधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ विभाग

मंडळाच्या माध्यमातून शहरात १६ विभाग कार्यरत आहेत.तसेच सिंधू लक्ष्मी नागरी सहाकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक नाग्रिकांना घर व्यवसाय उभारणीसाठी कर्ज दिले जाते़,उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्याचे काम केले जाते.
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर माहेरच्या नात्यांची मांगळसुत्रात केलेली पवित्र गुंफण याकरता तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्गातील स्थळे शोधण्यासाठी लॉगइंन करा sindhuswayamvar.com

Contact Information

SindhuDurga Bhavan,Dange Chowk,TherGoan

Phone:020-32341199

Mobile:9970199333

Email:sindhudurgamandal@gmail.com

Share with Others