सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ


सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाची स्थापना ही कोकणातील लोकांची नगण्य वस्ती असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात त्या काळी म्हणजे १ ऑक्टोबर १९७९ साली विजयादशमीच्या शुभमहुर्तावर करण्यात आली. आपण सर्वांनी संघटीत असले पाहीजे या जाणिवेतुन या मंडळाची उभारणी झाली. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाले नव्हते त्यामुळे मालवणी सभासदांची संख्या जास्त हे लक्षात घेवुन दक्षिण रत्नागिरी उत्कर्ष मंडळ या नावाने मंडळाने आपले कार्य सुरु केले. कालांतराने जिल्ह्याचे विभाजन झाले आणि "सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष" हे नाव पुढे नावारुपास आले.

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ कार्यकारिणी :

अध्यक्ष


श्री. अजय संभाजी पाताडे
Phone(o):020-32341199
Mobile: 9970199333
Email:truevisionflex03@gmail.com

उपाध्यक्ष

श्री. अरूण दळवी

Mobile: 9823041323

सरचिटणीस

श्री. चंद्रकांत गायकवाड

Mobile:9860192476

सहसरचिटणीस

श्री. प्रकाश् साईल

Mobile: 9689513553

खजिनदार

श्री. धर्मराज सावंत

Mobile:997015172

सहखजिनदार

श्री. चंद्रकांत साळस्कर

Mobile:9270130893

कार्याध्यक्ष

श्री. विश्वास राणे

Mobile:9822372456

आमच्या बद्दल :

गेल्या ३८ वर्षापासुन मंडळाची यशस्वी घोडदौड चालु आहे ती सुमारे २००० पेक्षा जास्त कुटुंब सभासद आहेत. अनेक कार्यकर्ते,हितचिंतक, अनेक मान्यवरांच मार्गदर्शन, देणगीदार यांच्यामुळेच. म्हणुनच पिंपरी चिंचवड शहरात हे मंडळ आज ठामपणे पाय रोवून उभे आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.अरविंद पालव, प्रमोद राणे, लक्ष्मण लाकम, राजाराम गावडे व सहकारी या नाट्यशौकिन मंडळींनी एकत्र येवुन मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या स्थापनेपासुन सलग २५ वर्षे श्री राजाराम उर्फ दादा गावडे यांनी अध्यक्ष पद भूषविले. त्यानंतर रामकृष्ण राणे आणि आजचे विद्यमान श्री अजय पाताडे अध्यक्ष आहेत एवढे मोठे मंडळ चालविणे सोपे जावे यासाठी मंडींळाने विभागांची स्थापना करुन पिंपरीचिंचवड मधील सर्व कोकणवासीयांना एका छत्राखाली आणले.आज मंडळाचे १६ विभाग आहेत, त्यावर विभाग प्रमुख नेमलेले आहेत. याशिवाय, मंडळाचे इतर विभागही आहेत. त्यामध्ये (नाट्यसिंधु) नाट्यविभागामार्फत शेकडो कलाकारांना रंगमंच उपलब्ध करुन दिला आहे.गरजु सभासदांना अडचणींच्या वेळी तात्काळ मदत मिळावी म्हणुन "सिंधुलक्ष्मी नागरी सह पतसंस्था" यशस्वी पणे कार्यरत आहे. सभासदांना याचा फायदा होत आहे. आजची मोठी समस्या आहे ती म्हणजे आपल्या मुलामुलींचे विवाह जमविणे त्यासाठी‘सिंधु स्वयंवर’ वधु वर सूचक विभाग मंडळ चालवित आहे. अनेक विवाह या माध्यमातून जमले आहेत, जमतही आहेत. सध्या sindhuswayamvar.com या वेबसाईट वरुन ऑनलाईन काम पाहिले जाते.तरुनांना योग्य दिशा मिळुन मंडळाचे कार्य सुलभ व्हावे तरुणांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी "युवासिंधु" हा विभाग कार्य करीत आहे.

नोकरीसाठी मर्गदर्शन व मदतही मंडळ करीत आहे. जिवनात सहलीला खुपच महत्व आहे, नव्हे ती गरज आहे आजच्या जीवनशैलीची. यासाठी लहान मोठ्या सहलींचे आयोजन मंडळ करीत असते.सर्व सभासद व कुटुंबिय याचा लाभ घेतात. यशिवाय तिळगुळ , हळदी- कुंकू समारंभ यासारखे कार्यक्रम प्रत्येक विभागात संक्रांतीनंतर आयोजीत केले जातात. महीलांची भीशी योजनाही चालु आहे. या निमित्त महीला एकत्र येतात.मंडळाचा कारभार एकाच जागेत होणे आवश्यक होते. मंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असुनही सभासद व इतरांच्या देणग्यामधुन मंडळाची आज तीन मजली वास्तू " सिंधुदुर्ग भवन " या नावाने डांगे चौक, थेरगांव पुणे या ठिकाणी डौलात उभी आहे.

 

कोकणातुन पुण्यात शिक्षण नोकरी-धंद्यासाठी येणाऱ्या गरजु युवकांना भविष्यात तात्पुरती राहाण्याची सोय करण्याचेही विचाराधीन आहे.जर एखाद्या सभासदास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर मंङळाच्या "अध्यक्ष निधी" तुन लगेचच मदत करण्याची तत्परता मंडळ नेहमीच दाखवीत आहे. मंडळाचे दोन मोठे सण म्हणजे १५ ऑगस्टला वार्षिक स्नेहसंमेलन व २६ जानेवरिला वर्धापन दिनानिमित्त मेळावा स्नेहसंमेलनाचे वेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या-जुन्या कलाकारांना आपली कला दाखविण्याची संधी मिळते.नाट्य विभागाचे कलाकार एखादे नाटक किंवा एकांकीका अगदी जिव ओतुन सादर करतात. त्यासाठी त्यानी खुप कष्ट घेतलेले असतात.मुलांना शालेय यशाबद्दल बक्षिसे,ट्रॉफिज देवून कौतुक केले जाते. मंडळाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन तसेच गावाकडील एखाद्या संस्थेस उल्लेखनिय कामगिरीसाठी "कोकणभूषण" हा पुरस्कार दिला जातो.सेवानिवृतांचा सत्कार केला जातो. वैवाहीक आयुष्याची २५ वर्षे पुर्ण करणाऱ्यांचाही सत्कार केला जातो. थोरामोठ्यांच्या विचारांचा आस्वाद येथे मिळतो. खुप छान कार्यक्रम असुन सर्वजण त्याची वर्षभर वाट पहात असतात. २६ जानेवरीला वर्धापन दिनानिमित्त मेळावा आयोजित करन्यात येतो. दिवसभराच्या या कार्यक्रमात श्री. सत्यनारायणाची पूजा, रक्तदान, अनाथआश्रमातील मुलांना मदत,कोकणातील लोकांच्या जिव्हाळ्याची संगीत भजन स्पर्धा,या मध्ये ११ ते १२ संघ सहभागी होतात. महीलांसाठी खास कार्यक्रम व स्नेह भोजन व्यवस्था असा भरगच्च कार्यक्रम या दिवशी असतो.

नाटक हा कोकणी लोकांचा अगदी आवडीचा विषय आहे.मंडळाने या विभागामार्फत खुप प्रगती केली आहे. अनेक नाटके, एकांकिका मंचस्थ केल्या आहेत. ४१५ वेळा एकांकीका, नाटकांचे दौरे यशस्वी केले आहेत. मंडळांतर्गत व खुल्या स्पर्धांमध्ये नेहमी नाट्यसिंधुचा सहभाग असतो. कोकणातील लोकांची शान वाढविण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा आमचा मानस आहे. मंडळाचे काम सुलभ करण्यासाठी कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कार्यक्रमात सुसुत्रता आण्यासाठी मासिक सभा,वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्यकर्ता शिबिरे, नाट्य शिबिरे , वधु वरांसाठी मेळावे, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविले जातात.

भविष्यकालीन योजना :

राष्ट्रीय प्रेमभावना वाढीस लावण्याच्या दृष्टीने सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे.आर्थिक मदत, विविध शिबीरे राबविणे,नदीसफाई,परिसर स्वच्छता, गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप असे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहोत.